Select Page

Pune University: पुणे विद्यापीठाच्या इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळावा यासाठी आलसी इंजिनियर चे प्रोफेसर रौनक खाबे आणि विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे विद्यापीठात गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत होते. याबाबत साठीचे सगळे कामकाज विद्यार्थ्यांच्या वतीने यांच्याकडून करण्यात आले. १८ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी विद्यार्थी विद्यापीठात आंदोलनासाठी जमले होते. विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

४ ऑगस्ट रोजी विद्यापीठाकडून कॅरी ऑन च्या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. याबाबतचे अधिकृत पत्रक लवकरच विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येणार आहे. आता पुढील परीक्षा कशा घेण्यात येणार आणि याबाबत आणखी माहिती विद्यापीठ प्रशासन लवकरच एक विस्तृत माहिती समोर आणेल. तूर्तास विद्यापीठाने हि माहिती मीडिया समोर मांडणे टाळले आहे.

पुणे विद्यापीठात इंजिनीरिंग करत असलेल्या विद्यार्थ्यांना आता कॅरी ऑन ची सवलत मिळालेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी इंजिनीरिंग मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण वाढलेले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वर्ष वाया जाणार याची भीती विद्यार्थ्यांना होती. पण आता विद्यार्थ्यांना मिळालेली हि संधी त्यांचे वर्ष वाचवणार आहे.