SPPU Exam 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी चे प्रवेश विद्यापीठाने सुरू केलेले आहेत. बहुतेक महाविद्यालयांचे ५० ते ६० टक्के अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. इंजिनीरिंग महाविद्यालयाच्या इनसेम परीक्षांना ४ तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आता राहिल्यल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी होणार? त्यांचे परीक्षा फॉर्म केव्हां सुटतील. या बाबत तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची सुरुवात हि जून महिन्यापासून सुरू झालेली आहे. काही परीक्षा ह्या जुलै महिन्यात सुद्धा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जुलै व ऑगस्ट महिन्यात जाहीर केले. परंतु अद्यापत काही अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही जाहीर होणे बाकी आहे. हे निकाल विद्यापीठ १० ते १५ सप्टेंबर च्या कालावधीत जाहीर करू शकते.
हे हि वाचा: SPPU Exam: पुणे विद्यापीठाचा कॅरी ऑन बाबत मोठा निर्णय! आता ‘या’ विद्यार्थ्यांना मिळेल पुढील वर्गात प्रवेश
हिवाळी परीक्षा कधी होणार सुरू?
सगळ्यात प्रथम बॅकलॉग परीक्षा फॉर्म सुटणार आहेत. विद्यापीठाकडून काही तात्पुरत्या तारीख समोर आल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम हफ्त्यात परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पदवीयुत्तर पदवीच्या प्रथम आणि द्वितीय परीक्षांचे फॉर्म सगळ्यात पहिले येतील असा अंदाज आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिना हा परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.
परीक्षा फॉर्म भरल्यानंतर परीक्षा लगेचच दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरु होऊ शकतात. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या दिवाळी आधीही होऊ शकतात. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या कालावधीत बहुतेक पेपर्स पार पडतील. राहता राहिलेले उत्तर असे कि परीक्षांचे पुर्नविनियोजन विद्यापीठ वेळेवर करेल आणि परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रकाशित होण्यास सुरुवात होईल.
Stay Updated With Aalsi Bachelor
Join our Telegram Group