Select Page

SPPU Exam: पुणे विद्यापीठ परीक्षा मंडळ अधिकाऱ्यांनी कॅरी ऑन बाबत घेतलेल्या निर्णयानुसार आज एक अधिकृत परिपत्रक जाहीर केलेले आहे. आता कॅरी ऑन म्हणजे काय? आणि कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार या बाबत तुम्हाला माहिती मिळणार आहे. पुणे विद्यापीठात असलेल्या विद्यार्थ्यांना आता कॅरी ऑन ची संधी मिळणार आहे. नुकतेच विद्यापीठाने आपल्या वेबसाईट द्वारे एक परिपत्रक जाहीर करून याची माहिती दिली. कॅरी ऑन बाबत हे परिपत्रक तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

SPPU Carry On Big Update

परिपत्रक क्रमांक ११७. २ पानांमध्ये विभाजित आहे. महत्वाचं म्हणजे यात विस्तृत गोष्टी नमूद केल्या आहेत जे तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. उन्हाळी परीक्षा २०२३ च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षांमध्ये विशेष प्रवेश देणे बाबत… नुकत्याच म्हणजेच उन्हाळी सत्र परीक्षा २०२३ मध्यें झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिलेले होते त्यामुळे ते पुढील वर्गात जाऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आहे. यांमध्येही काही अटी दिलेल्या आहेत.

पदवीपूर्व विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविद्यान व आंतरविद्याशाखीय अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक लागू असणार आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष इयर डाउन असेल त्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. परिपत्रकात नमूद असल्या प्रमाणे याबाबत तुम्हाला आणखी माहिती खाली दिलेल्या विडिओ द्वारे माहिती करू शकता.

विद्यार्थ्यांना इयर डाउन संबंधित या उलट विद्यापीठाची नवीन कॅरी ऑन स्कीम बद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर ते महाविद्यालयात एक्साम डिपार्टमेंटला विचारू शकता. एकंदरीत इंजिनीरिंग करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी केला गेलेला हे आंदोलन आता सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.

Stay Updated With Aalsi Bachelor

Join our Telegram Group